blast

गॅस कटरने रिकामा डिझेल टँक कापताना भीषण स्फोट; 3 जण जखमी

390 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये गॅस कटरने डिझेलचा रिकामा टॅंक कापत असताना एक भीषण स्फोट (Blast) झाला. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय घडले नेमके?
नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात (Automotive Chowk) एस एस बॉडी वर्क्स नावाचे एक गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये डिझेल गॅस टँक (Diesel gas tank) दुरूस्ती केला जात होता. यादरम्यान गॅस कटरने हा टॅंक कापत असताना अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता कि, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. या स्फोटानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!