मुंबई : भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपांमुळे सीबीआयच्या (CBI) रडारवर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Former Divisional Director of NCB Sameer Wankhede) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत समीर वानखेडे यांनी आर्यन खान (Aryan Khan) एनसीबीच्या कोठडीत असताना त्यांची अभिनेता शाहरुख खान याच्याशी मेसेजवरुन चॅटिंग झाली होती अशी कबुली दिली होती. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबत झालेल्या चॅटिंगचे तपशील आपल्या याचिकेसोबत जोडले होते. यामुळे आता कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणाला (Cordelia Cruz case) आता नवे वळण मिळू शकते.
There was an allegation of corruption against me earlier also and at that time the Mumbai Police investigated it and did not find any evidence against me. Nothing will be found even on the allegations by CBI: Sameer Wankhede
— ANI (@ANI) May 19, 2023
समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत स्वत:विरोधातील सर्व आरोप नाकारले आहेत. माझ्यावर यापूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी चौकशी केली होती. तेव्हा माझ्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नव्हते. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातही माझ्याविरोधात काहीच सापडणार नाही असे समीर वानखेडे म्हणाले आहेत. या प्रकरणी कोर्टाने 24 मे पर्यंत समीर वानखेडेंना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.