Dead

वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नाचत असताना 24 वर्षांच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

1980 0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या काकांच्या घरी देवाच्या नवसाचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात नाचत असताना अचानक भोवळ येऊन तरुण खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू (Dead) झाला. हा तरुण या आपल्या चुलत भावाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून त्या कार्यक्रमाला गेला होता. ही दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. संदीप निळकंठ चव्हाण (वय 24) (Sandeep Nilakant Chavan) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
चोपडा शहरातील रामपुरा (पारधीवाडा) येथे संदीप चव्हाण हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. गुरुवारी संदीप चव्हाण याच्या काकांकडे गावातच देवाच्या नवसाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी रात्रभर धार्मिक गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. याच कार्यक्रमात धार्मिक गाण्यांवर संदीप नाचत होता. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाचता नाचता संदीपला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला.

यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात (Chopra Upazila Hospital) दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रसाद पाटील (Dr. Prasad Patil) यांनी संदीप यास तपासून मृत घोषित केले. संदीपच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारासह नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!