Narendra Dabholkar

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस

523 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या (CBI) निर्णयाच्या विषयी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या विषयी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सुप्रीमकोर्टाने (Supreme Court) सीबीआयला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली.

न्या संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अहसुंद्दिन.अमनउल्लाह यांच्या समोर झालेल्या सुनावणी मध्ये ॲड.आनंद ग्रोव्हर आणि ॲड किशन कुमार यांनी ॲड अभय नेवागी यांच्या मार्फत तयार केलेल्या याचिकेवर बाजू मांडली. डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जरी संशयित आरोपींच्या वरती पुणे कोर्टात ट्रायल चालू आहे .सादर याचिका ही पुणे कोर्टातील खटल्याच्या देखरेखी साठी नसून ह्या खुनाचा सूत्रधार हा फरार असल्याविषयी आहे हे याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा मार्फत सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले .

डॉ दाभोलकर कॉ गोविंद पानसरे,गौरी लकेश आणि प्रा. कलबुर्गी यांचे खून हे एका व्यापक कटाचा भाग असल्याचे अनेक पुरावे समोर आल्याचे याचिके मार्फत मांडण्यात आले आहे. तसेच या मागचे सूत्रधार फरार असे पर्यंत विवेकवादी विचारवंतांच्या जीवाला असलेला धोका कायम आहे हे याचिका कर्त्यांमार्फत मांडण्यात आले आहे. या याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला त्याचा तपास बंद करण्याच्या भूमिके विषयी नोटीस बजावली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!