Vikhe And Pichad

पिचडांनानंतर आता विखे-पाटलांचा नंबर; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचे भाष्य

745 0

अहमदनगर: विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या (Agasti Cooperative Sugar Factory) निवडणुकीत जातीने लक्ष घालत ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची 28 वर्षांची सत्ता उलथवून लावली होती. मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे बडे नेते होते मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पवार कुटुंबियांना धोका देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता अजित पवार नगर जिल्ह्यातील आणखी एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार आहेत.

राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी भाजपचे नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता आहे. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात त्यांचे पारंपरिक राजकीय स्पर्धक काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) रिंगणात उतरणार आहेत. याबरोबर राष्ट्रवादीचे (NCP) विरोधीपक्ष नेते अजित पवारदेखील या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहेत.

या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकर कोल्हे आणि शिवाजीराव कोते पाटील यांचे अनेक वर्षे वर्चस्व होते. मात्र मागच्या काही वर्षांपासून या कारखान्यावर विखे पाटील यांची सत्ता असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व अजित पवार यांचे खंदे समर्थक संग्राम कोते पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना पवार यांच्याकडून साथ आणि रसद मिळणार आहे.अजित पवार यांच्यामुळे गणेश कारखान्याची निवडणूक (Election of Ganesh Factory) मोठ्या प्रमाणात गाजण्याची शक्यता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!