Prashant Damle

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड

620 0

मुंबई : पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. मात्र अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगे यांचा समावेश आहे. नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. “नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली आहे. तसेच नाट्यपरिषदेच्या कार्यवाहकपदी अजित भुरे निवडून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!