vodafone

दूरसंचार कंपनी व्होडाफोन ‘या’ कारणामुळे 11 हजार लोकांना कामावरुन काढणार

807 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटीश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने (Vodafone) पुढील तीन वर्षांत 11,000 नोकर्‍या (Job) आपल्या कंपनीतून कमी करणार (Layoffs) असल्याचे आज जाहीर केले आहे. सध्या व्होडाफोनच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्गेरिटा डेला व्हॅले (Margherita della Valle) एक संस्था शोधत आहे जे व्हाडोफोनचे काम आउटसोर्सने करतील.

यामुळे कंपनीतील अनेक विभागातील काम कमी होण्यास मदत होणार आहे असे मार्गेरिटा डेला व्हॅले म्हणाल्या आहेत. सध्या कंपनी आर्थिक समस्येसोबत झुंजत असून लवकरच वितरण व्यवस्था चांगली करण्यावर भर देणार असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

Share This News
error: Content is protected !!