Merath

हिंदू मुलाशी मैत्री केली म्हणून भर बाजारात जमावाचे मुस्लीम मुलींशी गैरवर्तन (Video)

560 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) मेरठमधून (Meerut) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि काही तरुण बुरखा घातलेल्या मुस्लीम मुलींशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. यामध्ये संतापजनक गोष्ट म्हणजे या व्हिडीओतील मुस्लीम मुलींनी एका हिंदू तरुणाशी मैत्री केली, म्हणून त्यांच्याशी हे गैरवर्तन करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही तरुण या मुलींना बुरखा काढण्यास सांगत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेरठ पोलिसांनी, या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

सध्या देशभरात ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून (‘The Kerala Story’ movie) वाद सुरु आहे. या चित्रपटात हिंदू मुलींशी मुस्लीम मुली मैत्री करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडतात, अशा आशयाची कथा दाखवण्यात आली आहे. त्यातच आता मुस्लीम मुलींनी हिंदू तरुणाशी मैत्री केल्यामुळे त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
व्हिडीओतील दोन मुस्लीम मुली मेरठच्या भगतसिंग मार्केटमध्ये (Bhagat Singh Market) एका हिंदू मित्रासोबत शॉपिंग करत होत्या. या वेळी काही लोक तिथे आले आणि त्यांनी मुलींना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शिवाय या जमावाने मुलींना त्यांचा चेहरा दाखवण्यास सांगितल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच “तुम्ही हिंदूंना मित्र बनवणार का?” असा प्रश्न जमावातील काही लोक मुलींना विचारताना दिसत आहेत.

तरुणाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ
यानंतर या जमावाने मुलींच्या हिंदू मित्रालादेखील प्रश्न विचारायला सुरुवात केली. या वेळी तो तरुण, “कृपया माझे ऐका, आम्ही स्टाफ आहोत,” असे सांगताना दिसत आहे. मात्र, जमावातील लोकांनी त्याचे ऐकून न घेता त्या तरुणाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मेरठ पोलिसांकडून गुन्हा (Crime) दाखल करण्यात असून पुराव्याच्या आधारे आरोपींना अटक करून पुढील कारवाई केली जाईल.

Share This News
error: Content is protected !!