Whats App

Whatspp ने सुरु केले ‘हे’ नवीन फीचर्स; सेंड केलेला मेसेज करता येणार एडिट

495 0

पुणे : आताच्या काळात जवळपास सगळेच जण व्हाट्सअ‍ॅप (Whatsapp) वापरतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअ‍ॅपचा वापर आपण एकमेकांना संदेश पाठवणे, व्हिडिओ आणि गाणी तसेच फोटो शेअर करणे यासाठी करत असतो. यामुळे व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स (Edit Feature) घेऊन येत असते. आता व्हाट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्स साठी एडिट मेसेज फीचर आणले आहे. त्यामुळे आता युजर्सला एखादा सेंड केलेला मेसेज एडिट करता येणार आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp मेसेज एडिट बटण फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध झाले आहे. जगातील सर्व बीटा युजर्ससाठी कंपनीने हे फीचर्स आणले आहे. व्हाट्सअ‍ॅपने अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी (Android beta testers) एडिट बटण रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी व्हाट्सअ‍ॅपने या आठवड्याच्या सुरुवातीला व्हाट्सअ‍ॅप वेबवर (WhatsApp Web) एडिट फीचर सादर केले होते, आता कंपनी हेच फिचर अँड्रॉइड यूजर्ससाठी आणण्याच्या तयारीत आहे.

कशाप्रकारे करणार मेसेज एडिट
यूजर्सना whatsapp च्या ओव्हरफ्लो मेनू मध्ये एक नवीन एडिट बटण दिसेल. मेसेज एडिट करण्यासाठी, यूजर्सना जो मेसेज एडिट करायचा आहे त्यावर काही वेळ बोट ठेऊन दाबून ठेवावे लागेल आणि नंतर उजव्या कोपऱ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मेसेज एडिट करण्यासाठी एडिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो एडिट करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज एडिट कराल तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये काहीतरी बदल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!