Adah Sharma

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; ट्विटरद्वारे दिली माहिती

896 0

मुबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिने या चित्रपटात केल्या अभिनयामुळे सर्वत्र तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. यादरम्यान अभिनेत्री अदा शर्मा हीचा अपघात झाला आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेत सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात असताना हा अपघात झाला.

अदा शर्माने दिली हेल्थ अपडेट
अदा शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. तिने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. “मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद”. असे ट्विट तिने केले आहे.

‘द केरळ स्टोरी’ने पार केला 100 कोटींचा आकडा
अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाने शनिवारी 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 2023 मधील हा चौथा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींचा आकडा गाठला आहे. सुदिप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Share This News
error: Content is protected !!