पुणे : पुण्यातील (Pune) खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धरणात सकाळी पोहायला गेलेल्या नऊ मुली पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात बुडाल्या. यामधील 7 मुलींना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे तर दोन जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास नऊ मुली गोरे बुद्रुक ( Gore Budruk) येथील कलमाडी फार्मच्या मागील बाजूस खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक या मुली पाण्यात बुडाल्या. ही गोष्ट लक्षात येताच जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिक लोकांनी या 9 जणींपैकी 7 जणांना सुखरूप बाहेर काढले.
उरलेल्या दोघीजणी बेपत्त झाल्या होत्या. त्यानंतर पीएमआरडीएचे अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच हवेली पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरु करत बेपत्ता झालेल्या मुलींचे मृतदेह बाहेर काढले आहेत.