crime

विचित्र चोराची, विचित्र चोरी ! घरात घुसून महिलांची ‘ही’ वस्तू नेतो पळवून; महिलांमध्ये दहशत

594 0

इंदौर : मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदौरमध्ये (Indore) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका चोरामुळे सध्या तिकडच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा चोर जरा विचित्र गोष्टींची चोरी (Theft) करत आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण हा चोर घरात घुसून महिलांसमोर अश्लील चाळे (obscene chale) करतो आणि त्यांच्या अंडरगारमेंट्स (Undergarments) चोरी करून पळून जातो. या प्रकरणी अनेक महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी या चोराला पकडण्यासाठी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज चेक केली असता चोराचा हा कारनामा उघडकीस आला. सध्या पोलिसांकडून या चोराचा शोध सुरु आहे.

ही घटना विजय नगर पोलीस ठाणे (Vijay Nagar Police Station) या परिसरामधील आहे. मागच्या काही दिवसांपासून या महिला या चोरामुळे त्रस्त झाल्या आहेत. हा चोर घरात घुसून महिला आणि तरुणींसोबत अश्लील चाळे करतो. त्यानंतर त्यांच्या अंडरगारमेंट्स घेऊन पळून जातो. या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिला आणि तरुणींनी आपल्या कुटुंबीयांसह विजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या चोराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

घाबरण्याचं कारण नाही; पोलिसांचे आवाहन
महिला आणि तरुणींनी घाबरण्याचे काही कारण नाही आहे. आम्हाला या प्रकाराची तक्रार मिळाली आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याची ओळख पटवली जात आहे. त्याला पकडून कठोर शिक्षा केली जाईल, असे पोलीस अधिकारी दिनेश वर्मा (Police Officer Dinesh Verma) यांनी सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide