Indian Army

भारतीय लष्कराची कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना धाडले कंठस्थानी

235 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) अनंतनाग (Anantnag) भागात दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय लष्करामध्ये (Indian Army) मोठी चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. या माहितीनुसार अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात ही चकमक झाली.

या चकमकीमध्ये भारतीय लष्कराकडून दोन ते तीन दहशतवाद्यांना कंठस्नानी धाडण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या तळावरुन काही प्रमाणात मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. तसेच जंगल परिसरात पोलीस आणि लष्कराची शोध मोहीम सध्या सुरु आहे.

गेल्या आठवड्यातसुद्धा झाली होती चकमक
5 मे रोजी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये (Rajouri) भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. ही चकमक राजौरीच्या मुठभेड जिल्ह्याच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये झाली होती. काश्मीर पोलिसांनी ट्विटरवरून ही माहिती दिली होती.

Share This News
error: Content is protected !!