ST-Bus

मोठी बातमी ! दोन महिन्यांनंतर एसटीमध्ये सुरु होणार कॅशलेस सुविधा

2852 0

मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या दोन महिन्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात इबी कॅश (Ebi Cash) या नव्या कंपनीची 38 हजार ॲन्ड्रॉइड बेस इलेक्ट्रिक तिकीट इशू मशीन दाखल होणार आहेत. यानंतर एसटीमध्ये कॅशलेस सुविधा (Cashless facility) उपलब्ध होणार आहे. आताच्या सुमारास सध्या एसटीत (ST) केवळ तीन टक्के व्यवहार कॅशलेस व्यवहार होताना दिसत आहेत. आताच्या सुमारास चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात येते. मात्र अजूनही राज्यातील नागरिकांच्या प्रवासाचे प्रमुख साधन असलेल्या एसटी महामंडळात सर्व व्यवहार पैशाने होतात.

सगळीकडे डिजिटल व्यवहार (Digital transactions) सुरु असताना मात्र एसटीमध्ये अजूनही ही सुविधा नसल्याने एसटी महामंडळाने देखील कॅशलेस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या वाहकांकडे ट्रायमॅक्स कंपनीच्या तिकिट मशीन होत्या. परंतु या मशिन सतत बंद पडत असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आता नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार महामंडळाने इबी कॅश या कंपनीकडून नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यात या कंपनीतर्फे महामंडळाला 34 हजार नवीन मशिन पुरविण्यात येणार आहेत. यामुळे वाहकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात एकूण 38,533 मशीन आहेत. यापैकी 42 टक्के अर्थात 18 हजार मशीन बंद आहेत. मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, वर्धा, गडचिरोली, अकोला आणि बुलढाणा या विभागांतील निम्म्याहून अधिक मशीन बंद आहेत.

प्रवाशांमध्ये नाराजी
उन्हाळी सुट्टीमुळे सध्या एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ई- शिवनेरी या बसमधील तिकिटांसाठी गुगल पे, फोन पे, भीम अ‍ॅप आणि इतर ऑनलाईन पर्यायांनी पैसे अदा करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!