sunil and kishore

किशोर आवारे हत्या प्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल

923 0

पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांची शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी आमदार सुनील शेळके(Sunil Shelke), सुधाकर शेळके(Sudhakar Shelke), संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले तक्रारीमध्ये ?
किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असत. किशोर आवारे यांनी एकदा आमदार शेळके आणि त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे आपल्या आईला सांगितले होते.

यादरम्यान किशोर आवारे यांनी मागील दोन वर्षांपासून स्वत:चा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय विरोध केला होता. यामुळे किशोर आवारे यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार शेळके यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे याच रागातून हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास सध्या तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत. आमदार सुनील शेळके व त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांचे मोबाईल फोन ‘नॉट रीचेबल’ आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!