Murder

Pune Crime News : धक्कादायक ! मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून; हपडसरमधील घटना

336 0

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरी दारु पिऊन शिवीगाळ करीत असलेल्या वडीलांशी झालेल्या वादातून मुलाने वडिलांना काठीने मारहाण करून त्यांचा गळा दाबून निर्घृणपणे खून केला आहे. रवि क्षीरसागर (वय 52) (Ravi Kshirsagar) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर ओंकार रवी क्षीरसागर (वय 27, रा. मांजरी) (Omkar Ravi Kshirsagar) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी रेखा रवी क्षीरसागर (वय 43, रा. घुले पाटील कॉलनी, मांजरी) (Rekha Ravi Kshirsagar) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

काय घडले नेमके?
मृत व्यक्ती रवी क्षीरसागर हे चप्पल शिवण्याचे काम करत होते. तर त्यांचा मुलगा ओंकार हा काही काम करत नाही. मृत रवी हे नेहमी दारु पिऊन येऊन शिवीगाळ करीत असे. घटनेच्या दिवशीदेखील ते नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आले आणि शिवीगाळ करू लागले. त्याचा राग आल्याने ओंकार याने वडिलांना काठीने मारहाण केली. यानंतर त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला.

यानंतर फिर्यादी यांना पती निपचित पडून असल्याचे दिसल्यावर त्यांनी रवी यांना रुग्णालयात दाखल केले. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर त्यांचे शवविच्छेदन केले असता त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर पत्नी रेखा यांनी मुलाची चौकशी केली असता त्याने वडील रवी यांचा खून केल्याचे उघडकीस आले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी ओंकार क्षीरसागर याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!