accident

धक्कादायक! नातेवाईकाच्या दहाव्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

3240 0

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे इस्कॉन मंदिरासमोर असणाऱ्या चौकाजवळील आरएमडी शाळेजवळ हा भीषण अपघात झाला. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे (वय 50, रा. बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय 45) अशी या अपघातात मृत पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. हे दोघेही घटनेच्यावेळी बाणेरवरून कोथळे पुरंदरकडे जात होते. एका नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी ते निघाले होते. यादरम्यान इस्कॉन मंदिरासमोरील चौकात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता कि, या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कोंढवा पोलिस दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!