Yuzvendra Chahal

IPL 2023 : युजवेंद्र चहल रचणार मोठा विक्रम ? फक्त एक पाऊल आहे दूर

702 0

मुंबई : यंदाच्या वर्षीची आयपीएल (IPL 2023) खूप रंगतदार होत चालली आहे. अजूनही यंदाच्या आयपीएलमधील क्वालिफायचे संघ मिळाले नाही आहेत. आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरोचा असणार आहे. याचबरोबर हा सामना युजवेंद्र चहलसाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 1 विकेट जरी घेतली तरी त्याच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे.

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपमध्ये के. एल. राहुलच्या जागी मुंबईच्या ‘या’ खेळाडूला देण्यात आली संधी

काय आहे युजवेंद्र चहलचा विक्रम?
सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये चहल संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. चहल आणि ब्राव्हो यांच्या नावावर 183 विकेट आहेत. चहल याने आज एक विकेट घेतली तर तो पहिल्या क्रमांकावर पोहचणार आहे. चहलने यंदाच्या सीझनमध्ये 11 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तसेच दोन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

ICC ODI Rankings : पाकिस्तानला मोठा धक्का! अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने गमावले पहिले स्थान

IPL इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –
ड्वेन ब्रावो – 183 विकेट (158 सामने)
युजवेंद्र चहल – 183 विकेट (141 सामने)
पीयूष चावला – 174 विकेट (175 सामने)
अमित मिश्रा – 172 विकेट (160 सामने)
रविचंद्रन अश्विन – 171 विकेट (192 सामने)
लसीथ मलिंगा – 170 विकेट (122 सामने )
भुवनेश्वर कुमार – 163 विकेट (156 सामने)
सुनील नारायण – 159 विकेट (158 सामने)
हरभजन सिंह – 150 विकेट (160 सामने)
रविंद्र जाडेजा – 148 विकेट (193 सामने)

Share This News
error: Content is protected !!