car

पापा की परीचा कारनामा : पार्किंगमध्ये उभ्या बाईक्सवर चढवली कार (Video)

965 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. यामध्ये काही व्हिडिओ हसवणारे तर काही संतापजनक असतात. तर काही व्हिडिओ हे भावुक करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एका तरुणीने चक्क पार्किंगमध्ये (Parking) उभ्या असलेल्या बाईक्सवर आपली कार चढवली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
हा व्हायरल होणारा व्हिडिओ हा उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) आहे. यामध्ये एका तरुणीने आपले ड्रायविंग स्किल दाखवले आहे. या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला बाइक स्टॅंडवर बाइक्स, स्कूटी खाली पडलेल्या दिसत आहेत. पुढे एक गाडी दोन-तीन बाइक्सवर चढवल्याचे पाहायला मिळत आहे. ही तरुणी गाडी पार्क करण्यासाठी रिव्हर्स येत असताना हि घटना घडली आहे.

पुण्यात नवरदेवाला पाठीमागे बसवून नवरीची बुलेटवरून रॉयल एन्ट्री; वऱ्हाडी बघतच राहिले

हा प्रकार घडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यातील काहीजण त्या तरुणीवर भडकतात. पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती तरुणी आपल्या तोऱ्यामध्ये असल्याचेही पाहायला मिळत आहे. @ItsRDil या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवरून काही युझर्सनी तिला ट्रोल (Troll) करायला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!