Uddhav Thackeray

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

374 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा देणारा आहे. तसेच कोर्टाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका चुकीमुळे त्यांचे सरकार कोसळले असल्याचे म्हणले आहे.

उद्धव ठाकरे यांनी केली होती ‘ही’ चूक
गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर अखेरीस सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते, असे मत मांडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळले होते.

बाकी चुकलं पण सरकार वाचलं !

आता कोर्टाने जाहीर केलेल्या निर्णयात जुने सरकार परत आणण्याची शक्यता फेटाळली आहे. तसेच महाराष्ट्रात शिंदे- भाजप सरकार राहणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी जर राजीनामा दिला नसता तर ते आज पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते.

Share This News
error: Content is protected !!