धक्कादायक ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट

823 0

मुंबई – सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे हिने एक खळबळजनक पोस्ट टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने आपल्या जिवाला धोका असून, माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची पोस्ट वैशाली हिने केली आहे.

वैशालीच्या फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं आवाहन वैशाली भैसने हिने फेसबुक पोस्ट मधून केले आहे. त्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

https://www.facebook.com/vaishalimadeofficialpage/posts/494981131987615

 

सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोची विजेती राहिलेल्या वैशालीने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. त्यानंतर ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या इतर शोमध्येही झळकली. नुकतंच तिने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

Share This News
error: Content is protected !!