mohan Maharshi

Mohan Maharishi: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाटककार मोहन महर्षी यांचे निधन

1102 0

पुणे : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक मोहन महर्षी यांचे निधन (mohan maharishi passed away) झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मोहन महर्षी यांच्या निधनाची माहिती अभिनेता पंकज झा कश्यप यांनी सोशल मीडियावर दिली आहे. ते प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते आणि नाटककार होते. महर्षी यांनी मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

‘मिस युनिव्हर्स’ सिएनाचे अपघात निधन; वयाच्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोहन महर्षीं यांची कारकीर्द
1955 मध्ये मोहन महर्षींनी ऑल इंडिया रेडिओमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी 1965 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला आणि 1983 ते 1986 या काळात ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक झाले. यादरम्यान त्यांना दिग्दर्शन क्षेत्रात 1992 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Hingoli News : हिंगोली हादरलं ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाकडून सासूची निर्घृणपणे हत्या

मोहन महर्षी यांनी आइन्स्टाईन (1994), राजा की रसोई, विद्यामा आणि सानप पेडी या नाटकांचे दिग्दर्शन केले तर अंधयुग, राणी जिंदन (पंजाबी), ऑथेलो, मदर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोजमध्येही काम केले होते. यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांची भूमिका साकारली होती. मोहन महर्षीं यांना भारतीय रंगभुमी आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!