Chitra Wagh : संजय राऊतांची लायकी नाही मोदींवर बोलण्याची; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

288 0

पुणे : भाजप नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात मागच्या काही दिवसांपासून आरोप- प्रत्यारोप (Chitra Wagh criticizes Sanjay Raut) सुरु आहेत. त्यातच आता भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोचरी टीका (Chitra Wagh criticizes Sanjay Raut) केली आहे. यामध्ये चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संजय राऊत यांची तुलना करत हि टीका केली आहे.

ब्रेकिंग ! ‘… तुझे एके 47 से उडा देंगे’, संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी…

नेमक्या काय म्हणाल्या चित्रा वाघ?
मोदीजींनी घाम गाळला कलम 370 हटवण्यासाठी, राम मंदिर बनवण्यासाठी, देशभर चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी परदेशात भारताचा लौकिक वाढविण्यासाठी असे सांगतांना संजय राऊतांनी घाम गाळला पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी…, मराठी माणसाला लुटण्यासाठी…,बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी…,कोविडमध्ये कंत्राटं घेऊन कमावण्यासाठी…, गैरमार्गानं आलेले 25 लाख भरण्यासाठी… अशी टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांची मोदींवर बोलण्याची लायकी नाही अशी बोचरी टीका केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!