ED

ईडीची मोठी कारवाई ! सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवारे पुनावाला यांची मालमत्ता जप्त

467 0

मुंबई : मुंबईमध्ये ईडीकडून (ED) सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संचालक झवारे पुनावाला (Zaware Punawala) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. झवारे पुनावाला हे सीरम इन्स्टिट्यूचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला (Cyrus Punawala) यांचे बंधू आहेत. ईडीने झवारे पुनावाला यांच्याविरोधात धडक कारवाई करत त्यांच्या तब्बल 3 स्थावर मातमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे संपूर्ण पुनावाला कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पनामा पेपर्स प्रकरणात झवारे पुनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळून आल्याने त्यांच्यावर फेमा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जवळपास 40 कोटींपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता ईडीकडून जप्त (Asset forfeiture) करण्यात आली आहे. झवारे पुनावाला यांच्या 3 स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तेची किंमत तब्बल 41 कोटी 64 लाख एवढी आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!