Vishwanath-Mahadeshwar

Vishwanath Mahadeshwar Pass Away : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

437 0

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Former Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar) यांचे आज ह्दयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ पूर्व (Santacruz), पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात ठेवण्यात येणार आहे. 2017 ते 2019 या काळात विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबई महापालिकेचे महापौरपद भूषवले होते. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांची राजकीय कारकीर्द
विश्वनाथ महाडेश्वर 2002 मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2017 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली. अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. ऋतुजा लटके यांचा पालिकेतून राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी महाडेश्वरांनी विशेष प्रयत्न केले होते.

आज दुपारी दोन वाजता पार्थिव राजे संभाजी विद्यालय, सांताक्रूझ(पूर्व) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide