heavy Rain

Heavy Rain Pune: पुण्यात येत्या 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

506 0

पुणे : रविवारी पुणे शहरात काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. तसेच आजदेखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. पुणेकर गेल्या काही दिवसांपासून याचा अनुभव घेत आहेत.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या तीन-चार तासांमध्ये पुणे शहरासह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, धाराशिव (उस्मानाबाद), सिंधुदुर्ग या ठिकाणी येत्या 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!