sharad pawar and ajit pawar

‘या’ कारणामुळे पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हतो; अजित पवारांचा खुलासा

439 0

पुणे : शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहात घेराव घालून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवड समिती, नेते आणि कार्यकर्त्यांचा मान राखत आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यांनी जेव्हा हि पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नेमके काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी आपण शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला का उपस्थित नव्हतो याचा खुलासा केला आहे. ज्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी मी माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकलो नाही.

शरद पवार बोलतील तीच भूमिका
तसेच अजित पवार म्हणाले शरद पवार बोलतील तीच पक्षाची भूमिका असणार आहे. महाविकास आघाडी होती, आहे आणि भविष्यात राहील. तीला कुठेही धक्का लागणार नाही. तसेच माझ्यावर ती प्रेम करणारे लोक संभ्रम निर्माण करत आहेत. काहींना माझं काम बघवत नाही, असा टोलादेखील अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.

Share This News
error: Content is protected !!