raj-thackeray

मनसेला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश

457 0

धाराशिव : धाराशिवमध्ये मनसेला मोठे खिंडार पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे विश्वासू प्रशांत नवगिरे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रशांत नवगिरे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

मनसेला मोठा धक्का
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखरराव हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. के. चंद्रशेखरराव यांनी महाराष्ट्रात विशेष: मराठवाड्यात जाहीर सभा घेत महाराष्ट्राच्या राजकारणात नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश देखील केला आहे. के. चंद्रशेखरराव यांनी धाराशिवमध्ये मनसेला खिंडार पाडत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

राज ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख
राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अशी प्रशांत नवगिरे यांची ओळख आहे. ते गेले 28 वर्ष भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांनी मनसेमध्ये असताना विविध पदे भूषवली आहेत. सध्या ते मनसेचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र आता त्यांनी मनसेची साथ सोडल्याने मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!