sharad pawar

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; शरद पवार अध्यक्षपदी कायम

387 0

पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला दिला होता. यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. शरद पवारांच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा निवड समितीकडून फेटाळण्यात आला आहे.

शरद पवारांनीच पदावर कायम राहावं, असा प्रस्ताव समितीकडून मांडण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हा प्रस्ताव मांडला. नवीन अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष नेमावा का याबाबत शरद पवार यांनीच भूमिका जाहीर करण्यावर समितीत चर्चा झाली.

समितीच्या बैठकीत झालेला निर्णय शरद पवार यांना कळवला जाईल. पण अंतिम निर्णय पुन्हा घेण्याचा अधिकार शरद पवार यांना असेल असे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून दोन गट तयार झाल्याचे पाहायला मिळाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!