Kondwa Police Station

पुणे हादरलं! संशयावरून पतीचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; पत्नीला बेडरुममधील पलंगाला बांधले आणि….

32873 0

पुणे : मागच्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीला जिवंतपणी नरकयातना दिल्या आहेत. या प्रकरणी पीडित पत्नीने आपल्या पतीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी नराधम पतीला अटक केली.

काय आहे नेमके प्रकरण?
घटनेच्या दिवशी पीडित महिला आपल्या 16 वर्षाच्या मुलीचा मोबाईल हातात घेऊन पाहत होती. पतीने हे पाहिले आणि त्याच्या मनात संशय निर्माण झाला. यानंतर आरोपीला आपली पत्नी कुणासोबत तरी बोलत आहे याचा राग आला. त्यानंतर त्याने पत्नीला ओढून बेडरुममध्ये नेले. यानंतर पत्नीला ओढणीच्या सहाय्याने बेडला बांधले. मग गरम हिटरने तिच्या अंगावर आणि गुप्तांगावर चटके दिले. हा आरोपी नराधम एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने हातपाय बांधून पत्नीशी क्रूर पद्धतीने शरीरसंबंध ठेवले. तसेच पत्नीच्या डोक्यात, हाता-पायावर खलबत्त्याने मारहाण केली.

यानंतर पीडित महिलेने कशीबशी आपली सुटका करून थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठले. या ठिकाणी तिने पोलिसांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपी नराधम पतीला अटक केली. तसेच या प्रकरणाच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे या दोघां पती- पत्नींच्या मुलांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!