शरद पवार निर्णय बदलणार? विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ‘ही’ महत्त्वाची महिती

531 0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले असून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना या निर्णयामुळं अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

या निर्णयानंतर माझा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक संपन्न झाली या बैठकीत बोलताना माझा निर्णय मी घेतला आहे. पण तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन-तीन दिवस द्या, असं शरद पवारांनी सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना आंदोलन बंद करण्याचं आवाहन केलं.

‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी धाडल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

Share This News
error: Content is protected !!