पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध घटकातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे.
शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यातील औंध भागात बॅनरबाजी करण्यात आले असून या बॅनरबाजी वर साहेब पदाधिकारी निवृत्त होत असतात जनतेच्या मनातील राजे नव्हे आज महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला तुमची गरज आहे अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.
याच बरोबरीने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी आर्त हाक देखील या फलकाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.