Crime

माता न तू वैरीणी! जन्मदात्या आईनेच केला मुलाचा खून

573 0

यवतमाळ शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुलाच्या सततच्या जाचाला कंटाळून जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा खून केला आहे.

२० एप्रिल रोजी ही घटना घडली होती, रविवारी ती उघडकीस आली. योगेश विजय देशमुख (वय २५) रा. नेरपिंगळी, ता. मोर्शी, जि. अमरावती असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी संशयीत आरोपी आईसह सहाजणांना अटक केली.

Share This News
error: Content is protected !!