पुणे पिंपरी-चिंचवड पीएमआरडीए भागातील प्रवाशांची आता गैरसोय होणार आहे. कारण पीएमपीएमएलच्या ताफ्यातून आता 337 बस लवकरच बाद होणार असून स्वमालकीच्या फक्त 654 बस राहणार आहेत.
महापालिकेच्या सर्वंकष आराखड्यानुसार पुणेकरांना सध्या साडेतीन हजार बसगाडय़ांची गरज आहे. मात्र, सध्या पीएमपीकडे स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या मिळून 2 हजार 89 बसगाडय़ा आहेत. त्यातील पीएमपीच्या स्वमालकीच्या 991 तर ठेकेदारांच्या भाडेतत्वावरील 1 हजार 98 बस आहेत. त्यातीलच व मालकीच्या 337 बसचे आयुर्मान दहा वर्षांपुढे गेले आहेत तर काहींचे संचलन सात लाख किलोमीटर पेक्षा जास्त आहे डिसेंबर 2022 मध्ये या 337 पास स्थापन बाद झाल्यात त्यामुळे आगामी काळात पीएमपीएमएलच्या बस लवकरच ताब्यातून बात करणार आहे. परिणामी ,ताफ्यातील बस संख्या आणखी कमी होणार आहे
पीएमपीएमएलच्या ताफ्यातज्या स्वमालकीच्या गाड्या आहेत त्यांची वर्षानुसार आकडेवारी काय आहे जाणून घेऊयात
0 ते 5 वर्षांपर्यंतच्या 643 बस
6 ते 8 वर्षांपर्यंतच्या 11 बस
9 ते 10 वर्षांपर्यंतच्या 183 बस आयुर्मान संपलेल्या
11 ते 12 वर्षांपर्यंतच्या 154 बस आयुर्मान संपलेल्या
स्वमालकीच्या एकूण बस 991
अगोदरच बस कमी असल्यामुळे गाडय़ांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होतं आहे. प्रवाशांना गाड्या वेळेवर उपलब्ध होतं नाहीत, त्यामुळं पाण्याची लाईफलाईन असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस यायला लागली आहे.