आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवण्यासाठी पतीने आणि त्याच्या प्रेयसीने पत्नीचे हातपाय बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने स्वतःची सुटका करून आपला जीव वाचवला. ही घटना खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.
या प्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पती आणि त्याच्या प्रेयसीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तिचा पती गेल्या काही दिवसांपासून चिंबळी परिसरात वास्तव्य करत आहेत. मात्र पतीचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध होते. पण पत्नीमुळं पती आणि त्याच्या प्रेयसीला एकत्र राहता येत नव्हते. वारंवार ती त्यांच्या संबंधात अडथळा निर्माण करत होती. मंगळवारी (दि.२५) दुपारी दोघांनी पत्नीचे हात पाय बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिच्यावर हल्ला केला.