रवींद्र साळेगावकरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी

1203 0

भाजपचा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांचा तपास करून त्याच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

याबाबत प्रशांत जगताप यांनी पोलीस आयुक्त रितेशकुमार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार भाजपचा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर यांनी पोलिसात दिली होती. साळेगावकर हा राजकीय कार्यकर्त्याच्या वेशातील एक गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असून काही वर्षांपूर्वी या व्यक्तीला खुनाच्या आरोपांमध्ये अटक केलेली होती.

तसेच तो काही वर्ष जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे. त्याचा कब्जा असलेली जमीन गोयल नामक व्यक्तीची असून त्यात अजित पवार यांचा दूरवर कोणताही संबंध नाही, गुन्हेगारी क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्याकरिता व एका लोकप्रिय नेत्यावरती आपण काही आरोप केले तर त्यातून प्रसिध्दी मिळून आपल्या वरिष्ठांना खुश करण्याकरिता त्याने अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.

साळेगावकर हा वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असुन दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या भूषण शंकर शिंदे यांच्या व त्यांच्या वडिलांच्या मुत्यूस कारणीभूत असल्याचा दाट संशय आहे. सदर प्रकरणाचा अत्यंत काटेकोरपणे तपास करून दोषी व्यक्तिस कडक शासन व्हावे अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख ,उदय महाले, संदीप बालवडकर, दीपक कामठे, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide