Breaking News

‘अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव…रवींद्र धंगेकरांच्या गाण्याचा धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

17187 0

काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे एक रॅपसॉंग खूपच व्हायरल झाले होते. ’50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी’ अशा शब्दांचा वापर केल्यामुळे या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता असेच एक गाणे तुफान चर्चेत आहे. कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे हे गाणे लोकप्रिय होत आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करणारं पण त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख नसणारे गाणे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत ‘हू इज धंगेकर ?’ असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यावरून चंद्रकांत पाटील ट्रोल झाले होते.

या गाण्यामध्ये ‘अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव… मतानं कसा उधलून टाकलाय डाव…’ अशा ओळींतून आमदार रवींद्र धंगेकर यांचं गाणं कलाकारांनी तयार केले आहे. बाबरी मशीद प्रकरणावरून बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिकांवर वक्तव्य करून चंद्रकांत पाटील आधीच चर्चेत आलेत. तर दुसरीकडे रॅपसाँग तयार करणाऱ्या काही रॅपर्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा स्थितीत आता चंद्रकांत पाटील यांच्यावर तयार केलेल्या या गाण्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!