गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद एन्काउंटरमध्ये ठार; यूपी STF ची मोठी कारवाई

1887 0

उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. झाशी येथे झालेल्या चकमकीत या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे.

अतिक अहमद मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

कारवाईदरम्यान STF ने अतिक अहमद आणि त्याच्या साथीदाराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, परंतु असद आणि गुलाम यांनी एसटीएफच्या पथकावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला पथकाकडूनही दोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात दोघांचा मृत्यू झाला. ठार झालेल्या दोघांवरही प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. उमेश पाल यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यापासून असद आणि गुलाम फरार होते.

योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

या कारवाईनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदित्यनाथ यांनी यूपी एसटीएफचे कौतुक केले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे नेते सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, पोलीस आणि एसटीएफ त्यांचे काम करत आहेत. कायद्याच्या आधारे ठोस कारवाई करू, असे सांगत ही कारवाईही संविधानाच्या अंतर्गत असल्याचे ते म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!