सलमानच्या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही मॉडेल आहे तरी कोण ?

1110 0

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणारी मॉडेल आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तिचे नाव आहे विनाली भटनागर.

विनाली भटनागर बऱ्याच काळापासून मॉडेलिंग इंडस्ट्रीत कार्यरत आहे. आता मॉडेलिंगमधून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी विनाली भटनागर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून ती झळकणार आहे. विनाली भटनागरचा हा पहिला चित्रपट आहे, याआधी तिने फक्त मॉडेलिंग आणि काही जाहिरातीत काम केले आहे.

विनाली भटनागर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सध्या एकापेक्षा एक बोल्ड फोटोंनी नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून विनाली भटनागरचे खूप बोल्ड फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये, विनाली काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समोरच्या बाजूने अनेक कट्ससह एकापेक्षा एक बोल्ड पोज देताना दिसत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!