‘सरकारला सुबुद्धी दे’; पुण्यात राम मंदिरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आरती, पाहा व्हिडिओ

516 0

घरपट्टीची वाढीव बिले तत्काळ रद्द करावी, पुणेकरांची घरपट्टी पूर्ववत व्हावी, तसेच घरपटी थकबाकीदारांवर सावकारी पद्धतीने लावले जात असलेले व्याजही तत्काळ बंद करावे अशी मागणी करत सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी काँग्रेसने तुळशीबाग राममंदिरात आरती केली.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस संजय बालगुडे व काँग्रसचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. घरपट्टीचे वाढीव ४० टक्के कमी करण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय झाला, मात्र त्याची अमलबजावणी अजून झाली नाही. पुणेकरांची अशी चेष्टा करू नये असा इशारा देण्यात आला.

ही वाढीव बिले तत्काळ रद्द करावी, पुणेकरांची घरपट्टी पूर्ववत व्हावी, तसेच घरपट्टी थकबाकीदारांवर सावकारी पद्धतीने लावले जात असलेले व्याजही तत्काळ बंद करावे, बील भरण्यास वर्षापेक्षा जास्त विलंब झाला तर व्याज लावण्यात येते व तेही सावकारी असते. महापालिका प्रशासन तेच करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश जारी करावा, प्रशासनाने त्याची त्वरित अमलबजावणी करावी अशी प्रार्थना तुळशीबाग रामंदिरात जाऊन करण्यात आली. रामाची आरतीही यावेळी करण्यात आली.

आमदार धंगेकर व जोशी म्हणाले, “पुणेकरांना सन १९७० पासून घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. महापालिकेने तसा ठराव मंजूर करून घेतला होता. असे असताना सरकारने ती अचानक बंद केली. प्रशासनाने तत्परतेने मालमत्ताधारकांना बिले पाठवली. त्यात २०१८ पासूनची थकबाकी दाखवली. साधी सदनिका असेल त्यांनाही यातून २० ते २१ हजार रूपयांची वाढीव बिले आली. हा सगळा प्रकारच पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा आहे.”

काँग्रेस सुरूवातीपासून ही वाढीव घरपट्टी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करत असल्याचे बालगुडे म्हणाले. स्वाक्षऱ्यांची मोहिम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्ऱ्यांना निवेदन दिले. मात्र सरकार बधायला तयार नव्हते. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मात्र मंत्री मंडळाने ही वाढीव बिले द्द करण्यात येतील असे सांगितले. मंत्रिमंडळात तसा निर्णय झाला, मात्र त्याबाबतचा सरकारी अध्यादेश अद्याप काढलाच गेलेला नाही. यावरून आता भारतीय जनता पक्ष पुणेकरांची चेष्टाच करत असल्याचे दिसते आहे अशी टीका बालगुडे यांनी केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!