जत्रेला कुटुंबासमवेत निघालेल्या अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य (व्हिडिओ )

516 0

हल्ली आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उंड्री पिसोळी इथे घडली. यावेळी अग्निशमन दलाचे जवान हर्षद येवले यांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

उंड्री पिसोळी येथील धर्मावत पेट्रोल पंपासमोर बीएमडब्ल्यु-एक्सवन या गाडीला आग लागली होती. आजूबाजूला कोणीही नव्हतं. परंतु त्यावेळी तेथील रहिवासी असलेले आणि कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात ड्युटी करणारे अग्निशमन दलाती जवान हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासमवेत सातारा रस्ता, केंजळ गाव इथे जञेकरता चारचाकी वाहनातून जात होते. रस्त्यात एका वाहनाने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याच दिसताच त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकल आहे का याची प्रथम पाहणी करुन धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ही माहिती मिळताच दलाकडून कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन आणि वॉटर टँकर रवाना करण्यात आले. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिक आणि कुटुंबियांनी ड्युटीवर नसतानाही जवान हर्षद येवले यांनी जी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचं आणि इतर जवानांच कौतुक केले.

या कामगिरीत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात, तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!