विमान हवेत असतानाच ‘दे दणादण’ ! अखेर लंडनला निघालेले विमान परत दिल्लीत

16459 0

विमान हवेत असतानाच प्रवासी आणि क्रू मेम्बरमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हे भांडण एवढे विकोपाला गेले की लंडनला निघालेले विमान परत दिल्ली विमानतळावर उतरवावे लागले.

मागील काही दिवसांपासून विमानात दोन प्रवाशांमध्ये हाणामारी होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येतात. एका प्रवाशाने तर दुसऱ्या प्रवाशांवर लघुशंका केल्याची घटना देखील उघडकीस आली होती. आता अशीच घटना समोर आली आहे. एअर इंडियाचं (AI-111) या विमानाने आज पहाटे 6.35 वाजता दिल्ली विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतलं होतं.

उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच प्रवासी आणि क्रू मेंबरमध्ये वाद झाला. या प्रवाशांनी हुज्जत घातली तेव्हा त्यांना त्यांच्या वर्तनाबाबत इशारा देण्यात आला होता. पण त्यात काही बदल झाला नाही. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की हे विमान तात्काळ दिल्लीला परत आणण्यात आलं. दिल्लीत विमान लँड होताच क्रू मेंबर्सनी उपद्रवी प्रवाशांना पोलिसांच्या हवाली केलं. एअर इंडियाने या प्रवाशांच्या विरोधात तक्रार दिल्याचं सांगितलं जात आहे.

क्रू मेम्बरचा विनयभंग

अलीकडेच मुंबईला येणाऱ्या विमानात एका स्वीडिश प्रवाशाने क्रू मेम्बरला स्पर्श करून विनयभंग केल्याची घटना घडली होती. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!