आरती सुरु असताना 100 वर्ष जुने कडुलिंबाचं झाड कोसळले, ७ जण दगावले

3256 0

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं कडुलिंबाचं झाड कोसळल्याने सातजणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. हे घटना काल रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या ठिकाणी भाविक एका दुःख निवारण कार्यक्रमासाठी एकत्र आले होते.

बाबूजी महाराज मंदिरात दर रविवारी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. रविवारी रात्री १० वाजता या ठिकाणी दुःख निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी भाविक सभामंडपात एकत्र जमले होते. आरती सुरु असताना संध्याकाळी वातावरणात बदल होऊन वादळी वारा आल्यामुळे बाजूच्या पत्र्याच्या शेडखाली काही भाविक जमले असतंच अचानक अंदाजे १०० वर्षाचे जुने कडुनिंबाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळले. या घटनेत सातजणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. 29 जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मदत कार्याला सुरुवात केली. झाड एवढं मोठं होतं की क्रेन आणल्यावरही झाडं उचललं जात नव्हतं. ‘माझ्या आयुष्यात मी अशी घटना पाहिली नाही. ही सर्वात मोठी दुर्देवी घटना घडली. इथली स्थिती पाहून काय बोलावं हेच कळत नव्हते. स्थानिक लोक, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी ताबडतोब आले. त्यांनी मदत कार्यही सुरू केलं’ असं आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं.

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेत जिल्हा प्रशासन आणि विद्युत विभाग तसेच महसूल विभाग आरोग्य विभागाला तात्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या. तसेच अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क करून त्यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच भारतीय भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही या घटनेची माहिती घेतली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!