महात्मा फुले जयंती निमित्त मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले वाडा येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, पुणे महानगर परिवहन महामंडळाने विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने गंजपेठ, कस्तुरी चौक व सोनावणे हॉस्पिटल मार्गे जाणाऱ्या बसेस जाहीर केल्या आहेत. या बसचे मार्ग पुढीलप्रमाणे –
स्वारगेट ते पुणे स्टेशनपर्यंत
५ अटल पुण्यदशम बस
मार्गे- सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट नाना पेठ
न.ता.वाडी ते कोंढवा खुर्द, 
कात्रज ते लोहगाव, 
धनवकडी ते पुणे स्टेशन, 
वाघोली ते येरवडा, 
येवलेवाडी ते पुणे स्टेशन, 
अप्पर डेपो ते पुणे स्टेशन
कात्रज ते खराडी
तेजस्विनी अशा १९ बस सेवा महात्मा फुले वाड्यापर्यंत जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            