NMACC च्या उदघाटन समारंभात सोन्याचा ब्लाउज घातलेल्या महिलेचीच चर्चा !

1078 0

मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या शानदार उदघाटन सोहळ्याला देश विदेशातील स्टार्स, राजकीय नेते, बॉलिवूडचे कलाकार मोठ्या संख्येने हजर होते. भव्य उद्घाटन नुकतेच झाले होते. या समारंभासाठी एक महिला आली होती तिने चक्क सोन्याचा ब्लाउज परिधान केला होता. उपस्थित सर्वांचे लक्ष ही महिला आपल्याकडे खेचून घेत होती. ही महिला आहे तरी कोण ?

प्रसिद्धीसाठी काहीतरी हटके करायची अनेकांना हौस असते. सोन्याचे दागिने घातलेले नेते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला नेहमी दिसतात. सोन्याचा शर्ट घातलेला व्यावसायिक तुम्हाला माहित आहे. पण सोन्याचा ब्लाउज घालून समारंभामध्ये मिरवणारी महिला प्रथमच पाहायला मिळाली. त्या आहेत प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर सुहानी पारेख.

मुकेश अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर’ मधील कार्यक्रमात त्यांनी २४ कॅरेट सोन्याचा ब्लाऊज परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या गर्भवती आहेत. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सुहानी पारेख स्वत: ज्वेलरी लेबल ‘MISHO’ चालवतात.

सुहानी पारेख यांनी आपले काही फोटो शेअर केले. त्यात त्या मेटेलिक साडीत दिसून येतात. तसेच 24 कॅरटचा रियल गोल्ड बेली आर्मरमध्ये बेबी बंपला फ्लॉन्ट केला होता. ब्लाऊज व सोन्याच्या आर्मरवर सुहानीने तिचा मुलाचा चेहरा कोरला होता. या लहान मुलांच्या चेहऱ्यावर सोनोग्राफी फोटोंज लावलेले होते. हे गोल्ड बेली आर्मरचे कवच अन् मॅचिंग गोल्डन ट्यूब ब्लाउज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!