चलो अयोध्या ! मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन त्याच पदाधिकाऱ्यांकडे ज्यांनी…….

756 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. या कार्यक्रमाचा एक टिझर देखील सोशल मीडियावर झळकला आहे. एकूणच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांसाठी रेल्वेची एक स्वतंत्र बोगी आरक्षित करण्यात आली आहे. तसेच या अयोध्या दौऱ्याची धुरा नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आली आहे.

नाशिकहून शिवसैनिक विशेष रेल्वेने दुपारी चारनंतर अयोध्येला रवाना होणार आहेत. 18 बोगीतून 1200 शिवसैनिक आयोध्येत दाखल होणार आहेत. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून खास टीशर्ट आणि रेल्वे बोगीवर लावण्यासाठी स्टिकर्स तयार करण्यात आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे. तालुका आणि विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांसाठी बोगी आरक्षित करण्यात आली आहे. अयोध्येत मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’ या बॅनरखाली अयोध्या दौऱ्याचा प्रचार सुरू केला आहे.

या अयोध्या दौऱ्याची धुरा नाशिकच्या त्याच पदाधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आली आहे. ज्यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन केले असे संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंचे पथक अयोध्येत दाखल झाले आहेत. हा दौरा यशस्वी करण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी नाशिकमधून तीन हजार कार्यकर्तेही रेल्वेने रवाना होणार आहेत. तसेच महाआरतीमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide