बिपाशा बासूने शेअर केले आपल्या चिमुकल्या ‘देवी’चे फोटो

1181 0

अभिनेत्री बिपाशा बासू म्हणजे बॉलिवूडची एकेकाळची मादक सौंदर्याची अभिनेत्री. विविध सिनेमांमधून तिने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. तिचा अभिनय देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून गेला. आता बिपाशा चित्रपटसृष्टीपासून दूर झाली असून आपल्या संसारात रममाण झाली आहे.

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी विवाह केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये बिपाशाच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. त्या परीचे नाव आहे देवी. बिपाशा आणि करण देवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोंमध्ये देवीचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे देवीला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आत बिपाशाने पुन्हा देवीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवीचा गोड निरागस चेहरा दिसून येतो.

बिपाशानं देवीच्या फोटोला कॅप्शन दिलं, ‘हॅलो वर्ल्ड, माझं नाव देवी आहे.’ बिपाशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी ही पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये दिसत आहे. बिपाशानं शेअर केलेल्या देवीच्या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री दिया मिर्झानं, ‘गॉड ब्लेस यू देवी’ अशी कमेंट केली. तर मलायकानं, ‘OMG’ अशी कमेंट केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!