सिंहगड एक्स्प्रेमध्ये महिला प्रवाशांचे गुपचूप व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला पकडले

851 0

दोन दिवसांपासून पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशांचे नकळतपणे व्हिडिओ शूटिंग होत असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. महिला प्रवाशांचे लपूनछपून व्हिडीओ काढणाऱ्या एका विकृत प्रवाशाला रंगेहात पकडले आहे. पकडलेला आरोपी हा मदरशामधील शिक्षक असल्याचे समोर आले आहे.

मोहम्मद अश्रफ असे व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती असे प्रकार करत होता. आज व्हिडिओ काढताना रंगेहात सापडला. धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांनी लगेच टिसीच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यानंतर टिसीने कल्याण पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून ठेवले होते. त्यानंतर प्रवाशांनी त्याला चांगला चोप देऊन कल्याण स्थानकात त्याला पोलिसांच्या हवाली केले. मागील दोन ते तीन दिवसापासून हा इसम या गाडीने ये जा करत सहप्रवासी महिलांचे व्हिडिओ तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोहमार्ग पोलिसांनी मोहम्मदवर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार कर्जत येथे घडल्याने हा गुन्हा व आरोपी कर्जत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!