‘मला देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकले…’ नवनीत राणा यांना अश्रू अनावर

652 0

हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा रडू आवरले नाही. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात हल्लाबोल केला.

राणा कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विस्तव देखील जात नाही. नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज हनुमान जयंती निमित्त अमरावतीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राणे दांपत्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

मुंबईत मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले होते. आज कारागृहातील अनुभव सांगताना नवनीत राण यांना अश्रू अनावर झाले. नवनीत राणा म्हणाल्या, ” लॉकअप काय असते हे मला माहित नव्हते. मी स्वत:ला विचारत होते की मी एवढी मोठी कोणती चुक केली की माझ्या महाराष्ट्राला अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. कोर्टात गेली तेव्हा सांगितले बेल होणार नाही. मात्र पोलीस स्टेशनची डायरी बघितली तेव्हा मला कळले की मला देशद्रोह म्हणून कारागृहात टाकण्यात आले”

Share This News
error: Content is protected !!