Breaking News

Breaking News ‘इलेक्शन मध्ये उभे राहू नको नाहीतर…..’ माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी

656 0

‘इलेक्शन मध्ये उभे राहण्याच्या भानगडीत पडू नको, अन्यथा गोळ्या घालून ठार मारू’ अशी धमकी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देण्यात आली आहे. तसेच बागवे यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे़

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार भवानी पेठेत मंगळवारी दुपारी ३ ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडला. अविनाश बागवे यांना काल एका अज्ञात इसमाने व्हाट्सअप वर मेसेज करून “तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद” करू अशी धमकी आली. तसेच पुढे या व्यक्तीने, “तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो” असा आणखी एक मेसेज आला.

या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अलीकडेच भाजपचे नेते गणेश बिडकर यांना खंडणीसाठी फोन आला होता. आता काँग्रेसच्या नेत्याकडे खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे पोलीस खंडणी मागणाऱ्याचा शोध घेत आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!